पुणे, दि. १९( punetoday9news):-  पोलिस मित्र संघटना नवीं दिल्ली भारत संस्थापक अध्यक्ष संतोष दादा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मित्र संघटनेतर्फे सामाजिक वनीकरण विभाग स्व. उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यान नऱ्हे, पुणे येथील वनविभागाच्या जागेतील झाडांना  ३०० किलो गांडूळ खत व पाणी पुरवठा करण्यात आला. 

यावेळी  महाराष्ट्र प्रदेश महिला आघाड़ी अध्यक्ष व अभिनेत्री आदिती पाटिल , महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष उमेद सुथार, भट्टी गाव अध्यक्ष योगेश कोकाटे, आंबेगाव युवक उपाध्यक्ष शुभम खाटपे, सदस्य प्रेम सिंह राठौड़, सचिन निवगुणे, मनोहर , ‘झाडे लावा, झाडे जगवा’ मित्र परिवार चे निसर्ग प्रेमी प्रविण भोसले, अजित पोमण , चंद्रकांत घाणेकर, गणेश वाकचौरे, विराट वाकचौरे, प्रशांत साळुंखे, वैभव शृंगारपूरे, विजय शिळीमकर, अनिल रवळेकर, दत्तात्रय मुलूख, चैतन्य मुलूख, साईल राजहंस तसेच इतर सदस्य उपस्थित होते.

 

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!