पिंपरी, दि. २०( punetoday9news):- मागील दोन वर्षांपासून वारीचा सोहळा कोरोना मुळे अनुभवता आला नव्हता मात्र यंदा मोठ्या प्रमाणात वारकरी व भक्तगण वारीची तयारी करत असल्याचे भक्तीमय चित्र तयार झाले आहे. टाळ,मृदुंगाच्या गजराने संपुर्ण वातावरण आनंदाने भरून जात आहे.
या वारकरी भक्तांची सेवा कोणत्या ना कोणत्या मार्गाने नागरिक करत असतात त्यानुसार महावितरण पुणे परिमंडळ सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मार्फत मागील १७ वर्षा पासून नाशिक फाटा येथे जगद्गुरु संत तुकारामांच्या पालखीतील वारकऱ्यांना भडंग चिवड्याचा अल्पोपहार वाटप करण्यात येतो.
या वर्षी ही वारकऱ्यांची सेवा म्हणून अल्पोपहार तयार करण्याचे काम चालू असून वारकऱ्यांची सेवा या माध्यमातून केली जात आहे. या कामाचे नियोजन शिवाजी शिवणेचारी करत असून पिंपरीतील महावितरणचा कर्मचारी वर्गही यात सहभागी होत असतो.
Comments are closed