मुंबई, दि. 21( punetoday9news):- राज्य विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी सोमवार दि. 20 जून 2022 रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली. उमेदवारांना जिंकण्यासाठीचा 2600 हा मतमूल्यांचा कोटा पूर्ण करण्यासाठी फेरीनिहाय मिळालेले मतमूल्य पुढीलप्रमाणे :
पहिल्या फेरीअखेर राम शिंदे (भाजपा) यांना 3000, श्रीकांत भारतीय (भाजपा) यांना 3000, एकनाथ खडसे (राष्ट्रवादी काँग्रेस) यांना 2900, प्रवीण दरेकर (भाजपा) यांना 2900, रामराजे नाईक निंबाळकर (राष्ट्रवादी काँग्रेस) यांना 2700, उमा खापरे (भाजपा) यांना 2700, सचिन अहिर (शिवसेना) यांना 2600 आणि आमश्या पाडवी (शिवसेना) यांना 2600 तर पाचव्या फेरीअखेर प्रसाद लाड (भाजपा) यांना 2857 इतके मतमूल्य मिळून त्यांनी विजयासाठीचा कोटा पूर्ण केला.
दहाव्या व शेवटच्या फेरीअखेर भाई जगताप (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) यांना 2474 इतकी मतमूल्य तर चंद्रकांत हंडोरे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) यांना 2200 इतकी मतमूल्य मिळाली. या फेरीअखेर अधिक मतमूल्यांच्या आधारे जगताप हे विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र भागवत यांनी जाहीर केले.
Comments are closed