सोशल मिडीया वर सर्वात जास्त या मेसेजची चर्चा.

महाराष्ट्रातल्या जनतेने पहाटेचा शपथविधी व तीन दिवसांचं सरकार, तसेच यापूर्वीही झालेल्या विविध पक्षातील नेत्यांच्या नाट्यमय राजकीय घडामोडी पाहिल्यया असल्याने सद्यपरिस्थितीतील राजकीय घडामोडींना गंमत म्हणूनही कित्येक नागरीक पाहत आहेत . असे यातून प्रकर्षाने जाणवते. 

सोशल मिडीयावर सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मिम्स चा पाऊस पडत असताना त्यात खालील मेसेज ने सर्वसामान्य नागरिकांच्या मनात खरोखर प्रश्न निर्माण केला आहे.

सेना भाजप युतीचे सरकार बननार. शिवसेना फुटणार नाही.
एकनाथ शिंदेंचा प्रस्ताव ऊध्दव ठाकरे स्विकारणार. हे सगळे नाटक चालू आहे. सगळे आधीच ठरले आहे.
१) एकनाथ शिंदे बंड करणे शक्य नाही.
२) बंड केलेच तर 35 आमदार जाणे हे शक्य नाही.
शिवसेनेला भाजप बरोबर जायचेच आहे. शिवसेना आमदारांना मविआ कडून पुन्हा निवडून यायची खात्री नाही. अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाची संपली आहे. तसे ही करुन खुर्ची खाली करायचीच होती. राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री घेण्यापेक्षा फडणवीसांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री घेतलेले चांगले. याचे फायदे असे.
१) उपमुख्यमंत्री पद
२) वाढीव मंत्री पदे.
३) केंद्रात एखादे मंत्री पद
४) ईडी पासून‌ चौकशी बंद होईल.
आणि सगळ्यात महत्वाचे सेना भाजप एकत्र येण्याचे कारण
५) मुंबई महानगरपालिका ताब्यात राहणार.
हे सगळे पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ठरवून चालले आहे. सेनेला भाजपकडे जाण्यासाठी ठोस कारण पाहिजे.

ते कारण म्हणजे
एकनाथ शिंदे..

अशा प्रकारच्या विविध मेसेजची सोशल मीडिया वर जोरदार चर्चा असल्याने पुढे नक्की काय? अशा तर्क- वितर्कांना तोंड फूटले आहे. तसेच महाराष्ट्रातील राजकारण हे राजकीय मुल्ये, जनतेचं हीत यापेक्षा सत्तेसाठीच सर्व धडपड यापुरते मर्यादित होतेय का? असेही बोलले जात आहे.

 

 

 

 




 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!