पिंपरी : – पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने दोनशे झाडांचे जाळीसह वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी आपल्या वाढदिवसाचा खर्च टाळून वैष्णवी पवार व अभिषेक पवार या बहीण-भावाने हे वृक्षारोपण करीत झाडे दहा फुटाची होईपर्यंत त्यांची जोपासना करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार हे आपल्या सहकाऱ्यांसह गेली दहा वर्षे वृक्षारोपण करीत आले आहेत. याचेच अनुकरण करीत अभिषेक पवार व वैष्णवी पवार या भावा-बहिणीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत धारूर व मोर्डा या ठिकाणी दोनशे झाडांचे वृक्षारोपण केले. शिवाय ही सर्व झाडे संरक्षक जाळीसह लावण्यात आली असून, झाडे दहा फुटांची होईपर्यंत त्यांना पाणी पुरवून त्यांचे जतन करण्याचे आश्वासनही दिले आणि दरवर्षी वाढदिवसाला २०० झाडे लावण्याचाही संकल्प करण्यात आला. याबरोबरच मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने १०० शेतकऱ्यांना केशर, आंबा, चिंच अशी ६ फूट उंचीची झाडे वाटप करण्यात आली. यावेळी ह.भ.प. जयहरी महाराज कुलकर्णी, काळूबापू ननावरे, प्रा. रत्नाकर खांडेकर, बालाजी पवार, विशाल पवार, दत्तात्रय पवार, रमेश कामठे, विजय पवार आदी उपस्थित होते.
Comments are closed