पिंपरी, दि.२८ ( punetoday9news):- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या मोरवाडी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये विविध ट्रेड्ससाठी ऑगस्ट २०२२ सत्राकरिता प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून विविध ट्रेड्सच्या प्रवेशाकरीता ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत, अशी माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी दिली. रोजगार तसेच स्वयंरोजगाराच्या दृष्टीने इच्छुक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन देखील आयुक्त पाटील यांनी केले आहे.
महापालिकेच्या वतीने मोरवाडी येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्था कार्यान्वित आहे. येथे विविध कौशल्यधारित ट्रेड्स शिकवले जातात. या विविध ट्रेड्ससाठी यावर्षीची प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यामध्ये जोडारी (फिटर, प्रवेश क्षमता- २०, प्रशिक्षण कालावधी २ वर्षे, पात्रता इयत्ता १० वी उत्तीर्ण ), कातारी (टर्नर, प्रवेश क्षमता- २०, प्रशिक्षण कालावधी २ वर्षे, पात्रता इयत्ता १० वी उत्तीर्ण), पत्रे कारागीर (शीट मेटल वर्कर, प्रवेश क्षमता- ४०, प्रशिक्षण कालावधी १ वर्षे, पात्रता इयत्ता १० वी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण), संधाता (वेल्डर, प्रवेश क्षमता- ८०, प्रशिक्षण कालावधी १ वर्षे, पात्रता इयत्ता १० वी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण), आरेखक यांत्रिकी (ड्राफ्टमन मेकॅनिक, प्रवेश क्षमता- २०, प्रशिक्षण कालावधी २ वर्षे, पात्रता इयत्ता १० वी उत्तीर्ण )
वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन, प्रवेश क्षमता- ४०, प्रशिक्षण कालावधी २ वर्षे, पात्रता इयत्ता १० वी उत्तीर्ण), इलेक्ट्रोनिक्स मेकॅनिक(प्रवेश क्षमता- ४८, प्रशिक्षण कालावधी २ वर्षे, पात्रता इयत्ता १० वी उत्तीर्ण) , इन्स्ट्रुमेन्ट्स मेकॅनिक(प्रवेश क्षमता- २४, प्रशिक्षण कालावधी २ वर्षे, पात्रता इयत्ता १० वी उत्तीर्ण), मेकॅनिक मोटार व्हेईकल(प्रवेश क्षमता- ४८, प्रशिक्षण कालावधी २ वर्षे, पात्रता इयत्ता १० वी उत्तीर्ण) प्रशितन व वातानुकुलीत टेक्निशियन (रेफ्रीजरेशन अंड एअर कंडीशनर टेक्निशियन, प्रवेश क्षमता- २४, प्रशिक्षण कालावधी २ वर्षे, पात्रता इयत्ता १० वी उत्तीर्ण), नळकारागीर (प्लंबर, प्रवेश क्षमता- ४८, प्रशिक्षण कालावधी १ वर्षे, पात्रता इयत्ता १० वी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण), रंगारी (पेंटर, प्रवेश क्षमता- २०, प्रशिक्षण कालावधी २ वर्षे, पात्रता इयत्ता १० वी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण), तारतंत्री (वायरमन, प्रवेश क्षमता- २०, प्रशिक्षण कालावधी २ वर्षे, पात्रता इयत्ता १० वी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण), कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट (प्रवेश क्षमता- ४८, प्रशिक्षण कालावधी १ वर्ष, पात्रता इयत्ता १० वी उत्तीर्ण) या ट्रेड्सच्या प्रवेशाकरीता ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत.
विविध ट्रेड्स प्रवेशासाठी https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर संपर्क साधून केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत बाबत कार्यवाही करावी. मोरवाडी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेबाबत संपूर्ण माहिती या संकेतस्थळावर
उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. संस्थेतील सर्व प्रवेशित जागांवर शासन नियमावली व आरक्षणानुसार ऑनलाईन केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे ( कॅप राउंड) प्रणालीनुसार १०० टक्के जागांवर प्रवेश दिला जाणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील रहिवाशी विद्यार्थ्यांना वार्षिक प्रशिक्षण शुल्क १५०० रुपये व अनामत रक्क्कम ६०० रुपये इतके आकारण्यात येणार आहे. तर पिंपरी चिंचवड महापालिका हद्दी बाहेरील विद्यार्थ्यांना वार्षिक शुल्क ५ हजार रुपये आणि अनामत रक्कम ६०० रुपये आकारण्यात येईल, अशी माहिती मोरवाडी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शशिकांत पाटील यांनी दिली.
ऑनलाईन अर्ज आणि पर्यायी अर्ज भरण्याची सुविधा मोरवाडी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये निशुल्क उपलब्ध आहे. संस्थेमध्ये प्लेसमेंट आणि कक्ष उपलब्ध असून आयटीआयचे प्रशिक्षण म्हणजे रोजगाराची हमी आणि स्वयंरोजगाराची संधी असून प्रवेशोत्सुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी मोरवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये संपर्क साधावा असे प्राचार्य पाटील यांनी सांगितले.
Comments are closed