मुंबई, दि. २८( punetoday9news):- राज्यपालांनी विरोधी पक्ष नेत्यांच्या मागणीनुसार महाराष्ट्रातील मविआ सरकारला बहुमत चाचणीद्वारे विश्वासदर्शक ठरावास सामोरे जाण्याचे आदेश देणार असल्याची माहिती समोर येत आहे. आता बहुमत चाचणीबाबत राज्यपाल काय आदेश देतात किंवा निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कथित पत्रानुसार 30 तारखेला विशेष अधिवेशन सुरु होण्याची शक्यता असून सरकारला बहुमत विश्वास उद्धव ठाकरे सरकारला सिद्ध करावे लागेल.
राज्यपालांनी हे पत्र सचिवांना पाठवले असल्याचा यात उल्लेख करण्यात आला होता .
तसेच
यातील भाषणे छोटी – छोटी असावीते हेही सांगण्यात आले आहे .
याचे व्हिडिओ शूटिंगही करण्याची मागणी करण्यात आली आहे . त्याच दिवशी त्याचा निर्णय घेण्यात यावा .
सदस्यांची सुरक्षा सदनाच्या आत आणि बाहेर ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
असेही त्यात नमूद करण्यात आले होते .
याबाबतीत विविध वृत्त वाहिन्यांनीही यास दुजोरा दिला आहे.
Comments are closed