जिओ आता अजून एका नवीन करारासाठी सज्ज आहे. मुकेश अंबानींच्या जिओ मध्ये गुंतवणूकीचा ओघ हा सुरूच आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) कंपनीच्या ४३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला आज सुरूवात झाली आहे. यावेळी मुकेश अंबानी यांनी एक मोठी घोषणा केली आहे. गुगल जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये ३३ हजार ७३७ कोटी रुपये गुंतवणार असल्याची माहिती यावेळी अंबानी यांनी दिली आहे. या गुंतवणूकीद्वारे गुगल कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये ७.७ टक्क्यांची हिस्सेदारी घेणार आहे.
Comments are closed