पिंपळे गुरव, दि. २( punetoday9news):- आषाढी वारीच्या दोन्ही पालखी मार्गांवर पायी चालणाऱ्या वारकऱ्यांसाठी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत आरोग्य सेवा चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने पुरवली जात आहे.
या आरोग्य सेवा पथकांबरोबर अँब्युलन्सेस, तज्ञ डॉक्टर्स, नर्सेस, सेवाभावी कार्यकर्ते अथक सेवा देत आहेत. यात अनेक वारकरी या आरोग्य सेवेचा लाभ घेतात. यामध्ये वारकऱ्यांच्या आजारांवर चिकित्सा व औषधोपचार केले जातात.
ता वारीत सेवा देण्याकरिता संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मार्गावर डॉ. मनीषा साबणे, डॉ. देविदास शेलार तसेच पैरामेडिकल चे विद्यार्थी आपली आरोग्य सेवा देत आहेत. तर संत तुकारामांच्या पालखी मार्गावर डॉ. संतोष चव्हाण, डॉ. माऊली घोलप, भाऊसाहेब जाधव, हरिश्चंद्र गायके तसेच पैरामेडिकल चे विद्यार्थी वारकऱ्यांसाठी आरोग्य सेवा देत आहेत.
या दोन्ही पालखी सोहळ्यासोबत वारकऱ्यांच्या सेवेकरीता दोन रुग्णवाहिका आणि दोन टँकर चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट कडून आपली सेवा देत आहेत. यंदा ट्रस्टच्या माध्यमातून डॉक्टर्स, औषधे व आरोग्यविषयक सेवा पालखी सोहळा समारोपापर्यंत विनामूल्य पुरविण्यात येणार आहे.
या उत्कृष्ट आरोग्य सेवेबद्दल वारकरी ही आभार मानत आहेत.
Comments are closed