नवी सांगवी,दि. ३( punetoday9news):-  नवी सांगवी येथील बाबुरावजी घोलप विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वृक्ष आणि पुस्तक दिंडी काढून परिसरातील लोकांची मने जिंकली.

पंढरीचा पांडुरंग, संत ज्ञानेश्वर महाराज , संत तुकाराम महाराज, सोपानदेव, निवृत्ती महाराज, मुक्ताबाई, छत्रपती शिवाजी महाराज, तानाजी, श्री कृष्ण, अश्या विविध भूमिका विद्यार्थ्यांनी पालखीत साकारून चैतन्यमय आणि भक्तीपूर्ण वातावरण तयार केले होते.

लहान मुलांनी वारकऱ्यांची भूमिका साकारून टाळ मृदूंग च्या गजरात विठ्ठल नामाचा जयघोष करीत दिंडी सोहळा पुर्ण केला.झाडें लावा, झाडें जगवा”, “वाचवाल पाणी तर सुखी होईल भविष्याची निर्मिती”,  “वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचारी”, “पाणी म्हणजे जीवन, सुखी जीवनाचे साधन” अश्या घोषणांनी परिसर दणानून गेला होता.

 

कृष्णा चौक, फेमस चौक, शिवनेरी चौक, साई चौक येथे विद्यार्थी आणि अध्यापक, अद्यापिका यांनी फुगड्या घेळून, फेर धरून पालखी सोहळ्याची रंगत वाढवली. परिसरातील व्यक्ती, व्यापारी आणि व्यावसायिक यांनी पालखीला हार घालून पालखीचे स्वागत केले.

पालखीचे आयोजन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संजना आवारी, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापक मनीषा वळसे यांच्या मार्गदर्शनातून केले होते. पालखी सोहळ्यात विद्यालयातील संजय मेमाणे, चंद्रशेखर वाघमारे, सुजाता चासकर, वैशाली शिंदे, हेमलता खरमाळे, प्रीती भुयार, मनीषा कोकरे, मनीषा आहेर, प्रज्ञा नाईक, बाळासाहेब चांधेरे, नंदकुमार जोशी, माधुरी जमादार, शरद शेळके, अर्चना धुमाळ आदी शिक्षक शिक्षिका सहभागी झाले होते. दिंडीची सांगता विद्यालयात दिंडी परत आल्यावर पसायदान म्हणून झाली. विद्यार्थ्यांना खाऊ देऊन, सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक मुख्याध्यपिका संजना आवारी यांनी केले. अतिशय भक्तिमय वातावरणात हा दिंडी चा पालखी सोहळा पार पडला.

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!