पिंपरी:  कोरोनाचे सावट शहरात दिवसेंदिवस गडद होत असल्याने संसर्ग रोखण्यासाठी शहरात दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. हा लाॅकडाऊन १९ जुलै पासून लॉक डाऊन अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यवसायासाठी काही अंशतः शिथील केला जाणार आहे याच पार्श्वभूमीवर येत्या ३ ऑगस्ट ला रक्षाबंधन सणाचा विचार करून राखी विक्रीला १९ जुलै पासून परवानगी द्यावी अशी मागणी राखी उत्पादक व विक्रेत्यांच्या वतीने सीमा कुुंकुलोळ यांनी पिंपरी चिंचवड शहराचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या कडे केली आहे .

राखी व्यवसायात वर्षभर हजारो हात कार्यरत असतात अनेक कुटुंब यावर अवलंबुन असतात. शहरात अनेक गरजू महिला व अंध-अपंग बांधवांना या व्यवसायातुन वर्षभर रोजगार मिळत आहे. राखीचे उत्पादन हे हस्तकलेतून करण्यात येते. या व्यवसायात अद्यापही मशीनकाम केले जात नाही. वर्षभर मेहनत करून या राख्या आपल्या उद्योगनगरीत बनविल्या जात आहेत. येथील राख्या या राज्यभर पाठविल्या जातात. सुमारे चार ते पाच हजार व्यापारी, कामगार,गरजू महिला,अंध-अपंग व्यक्ती या व्यवसायावर अवलंबून आहेत. कोरोनाचे संकट असले तरीही नात्यांची वीण घट्ट करणारी ही राखी घेण्यासाठी अनेक ग्राहक (महिला) बाजार पेठेत जाणार आहेत. २४ जुलै रोजी लॉक डाऊन संपताच राखी खरेदी साठी अनेक व्यावसायिक घाऊक व्यवसायिकांकडे खरेदीसाठी तर ग्राहक बाजारपेठेकडे वळणार आहेत. यामुळे बाजारपेठेत गर्दी वाढू शकते. तसेच काही भगिनी  राखी पाठविण्यासाठी पोस्ट व कुरियर सेवांचा वापर करतात त्यामुळे त्यांनाही पूरेसा वेळ मिळून राखी भावांपर्यत वेळेत पोहोचेल. हा विचार करता पिंपरी-चिंचवड शहरात १९ जुलै पासून राखी विक्री च्या व्यवसायाला परवानगी द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

 

 

Comments are closed

error: Content is protected !!