देहू,दि.३ ( punetoday9news):- आज महाराष्ट्रातील राजकारण वेगवेगळी वळणे घेत असून भविष्यात कोणती राजकीय समीकरणे असतील हे शोधने कठीण बनले आहे. एवढंच काय तर सत्तेच्या सारीपाटावर कुणाची खुर्ची येईल आणि जाईल हे राजकीय विश्लेषक ही ठामपणे सांगू शकत नाही. अशा बदलत्या राजकारणावर भाष्य करणारी कविता कवी संदीप परंडवाल यांनी सादर केली आहे.
सत्ताकारण
कसली निष्ठा? अन कसली तत्व?
कसला आचार? अन कसला विचार?
सत्येच्या हव्यासात इथे निष्ठावंतही लाचार!!
कधी गळाभेट, तर कधी भांडून!
आकड्यांचा मेळ जुळला की घ्यायची
सत्ता वाटून!
मागच्या आश्वासनांना मिळते मूठमाती!
नवा गडी नवे राज्य,अन नव-नव्या युती !!
सोयीचं राजकारण, सोयीनुसार पक्ष!
विसरून शपथ,रोज नवी ध्येय अन नवे
लक्ष!
सामान्य जनता मात्र सोपे अन ठरलेले
भक्ष्य!!
टीकेची झोड उठवताना जीभेला नसतं
हाड!
आपलेच स्वकीय मग होतात बळीचे सांड!
तशातही गोड ठरते झाडी, हॉटेल डोंगार
अन पहाड!!
दुसऱ्याची गाडी,तिसऱ्याचा गॉगल!
उधारीचे पैसे अन लावलेली कॉटर!
सर्वपक्षीय गरीब कार्यकर्त्यांची वाढे बीपी
अन शुगर!!
आजचा मित्र जणू अस्तित्वावर उठतो!
कालच्या शत्रुत मित्रत्वाचा साक्षात्कार
होतो!
संभ्रमाच्या डोहात जनता जाते बुडून
नव्या सत्तेचा जन्म होतो सारे विरोध
डावलून!!
– संदीप दि.परंडवाल.
कवी संदीप परंडवाल हे आयटी कंपनीत कार्यरत असूनही ते कवितेच्या माध्यमातून साहित्याची आवड जपतात. विविध कार्यक्रमात कविता सादर करतात. काही दिवसांपूर्वी इंद्रायणी नदी काठी झालेल्या काव्य सम्मेलनात त्यांना उत्कृष्ट कवी म्हणूनही सन्मानित करण्यात आले.
Comments are closed