पिंपरी, दि. ३( punetoday9news):-  आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधीतून सुमारे तीन लाख रुपये किंमतीची ओपन जिम जगताप डेअरी येथील शुभाष्री हौसिंग सोसायटी नजीकच्या बागेत बसवण्यात आली.

प्रभाग 26 मधील नगरसेविका आरती चोंधे पाटील , संकेत चोधे पाटील आणि सोसायटीचे चेअरमन डॉ. राम कल्याणकर यांनी  यासाठी  प्रयत्न केले.
या ओपन जिम चे उद्घाटन नगरसेविका आरती चोंधे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमासाठी जगताप डेअरी भागातील नागरिक राजेंद्र पाठक, डॉ. रामेश्वर पटेल, सागर जाधव , आर.बी. मानकर, नाथ गावडे, प्रितेश हिंगमिरे, किरण जाधव, सुजाता पडवळ उपस्थित होते.

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!