दापोडी, दि. ४( punetoday9news):- भारतीय ज्ञानसाधनेला सातासमुद्रापार वैश्विक लौकिक मिळवून देणारे, युवकांचे प्रेरणास्रोत,
स्वामी विवेकानंद यांची आज पुण्यतिथीनिमित्त जनता शिक्षण संस्थेचे स्वामी विवेकानंद विद्यामंदीर, दापोडी येथील स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्यास नगरसेवक राजाभाऊ बनसोडे नगरसेवक संजय कणसे स्वामी विवेकानंद शाळेच्या प्राचार्या कल्याणी कुलकर्णी यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दापोडी येथे करण्यात आलेले सुंदर अक्षरातील फलकलेखन.

स्वामी विवेकानंद यांनी भारतीय तरुणांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना रुजवत स्वतःच्या आणि देशाच्या उन्नतीसाठी सर्वोत्तमरित्या काम करण्यासाठी प्रेरित केले. भारताला स्वतःच्या अस्मितेची त्यांनी जाणीव करून दिली असे मनोगत माजी नगरसेवक राजाभाऊ बनसोडे यांनी व्यक्त केले.

स्वामी विवेकानंद यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करताना मान्यवर.

त्याप्रसंगी उपप्राचार्य विठ्ठल कढणे, पर्यवेक्षक रवींद्र फापाळे जनता शिक्षण संस्थेचे जॉईंट सेक्रेटरी हेमंत बगनर, असिस्टंट सेक्रेटरी रामेश्वर होनखांबे, संतोष शिंदे, अनिल पाटील, राजू रघावंत, उपप्राचार्या रत्नप्रभा काकडे, सुनंदा गायकवाड पुष्पलता सोनवणे, उमेश अडागळे यावेळी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहसीन शेख तर आभार आलेक्स दास यांनी मांडले.

 

 

 

 

 

 




Comments are closed

error: Content is protected !!