ओबीसी आरक्षणाशिवायच निवडणूक होण्याची शक्यता.
नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी १८ ऑगस्ट रोजी मतदान होणार असून दुसऱ्याच दिवशी १९ ऑगस्टला निकाल लागणार आहे .
मुंबई, दि. ८( punetoday9news):- मुख्यमंत्री पदावरून झालेले राजकारण संपताच राज्यात आता पुन्हा निवडणुकींचा रंगीत सामना बघायला पाहायला मिळणार आहे .१७ जिल्ह्यातील ९२ नगरपरिषदा व ४ नगरपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे .
त्यानुसार अंतिम प्रभाग निहाय मतदार याद्या अधिप्रमाणे करून 5 जुलैला प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत .
जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यक्रम जारी करण्याची तारीख ही 20 जुलै अशी ठरविण्यात आली आहे .
तर नामनिर्देशन पत्र राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरण्याकरता उपलब्ध असण्याचा कालावधी २२ जुलै ते २८ जुलै असणार आहे .
म्हणजेच या तारखेत उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे .
यात रविवार असल्यास उमेदवारी अर्ज स्वीकारला जाणार नाही त्यामुळे उमेदवारांनी तीही काळजी घेणे गरजेचे आहे .
अर्जांची छाननी झालेल्या उमेदवारांची यादी ही २९ जुलैला सकाळी ११ वाजल्यापासून प्रसिद्ध करण्यात येणार आहे .
अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ही ४ ऑगस्ट दुपारी ३ वाजेपर्यंत असेल .
Comments are closed