पुुणे, दि. ९( punetoday9news):-  महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मामासाहेब मोहोळ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार (दि. ९) रोजी करिअर कट्टा या उपक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे यांच्या हस्ते करण्यात आले.


याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. बाळकृष्ण झावरे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की , करिअर कट्टा हा उपक्रम नियमित अभ्यासक्रमा बरोबरच विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी, स्पर्धा परिक्षा , करिअर तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासा साठी उपयुक्त आहे. विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले.


कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यशवंत शितोळे म्हणाले की आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थ्यांकडे कौशल्य असणे गरजेचे आहे. करिअर कट्टा अंतर्गत आयएएस , युपीएससी, एमपीएससी, परीक्षा सायबर सिक्युरिटी, इ.फाईल्स, सारखे विविध कोर्सेस तसेच इतर स्पर्धा परीक्षा साठी व उद्योगासाठी करिअर कट्टामार्फत मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यातून विद्यार्थ्यांना वरिष्ठ अधिकारी व उद्योजक होण्याच्या संधी उपलब्ध होणार आहे.
या कार्यक्रमाचे नियोजन प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या करियर कट्टा समन्वयक डॉ. नीता कांबळे यांनी केले कार्यक्रमाचे आभार महाविद्यालयाचे करियर कट्टा समन्वयक प्राध्यापक तानाजी जाधव यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुणवत्ता सिद्धता कक्षाच्या समन्वयक डॉ. सपना राणे यांनी केले.
सदर कार्यक्रमासाठी उपप्राचार्य डॉ. एस.बी.शिंदे , डॉ.मेघना भोसले तसेच प्रथम वर्ष वर्गातील १३२ विद्यार्थी उपस्थित होते. हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

 

 




 

Comments are closed

error: Content is protected !!