सांगवी, दि. १०( punetoday9news):- सांगवी परिसर महेश मंडळाच्यावतीने सांगवी येथील मराठी प्राथमिक शाळेतील हुशार, होतकरू अशा ३१५ हुन अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या साहित्यामध्ये कंपासपेटी , वह्या , स्केच पेन , पेन्सिल इ. चा समावेश होता .
या शालेय साहित्याचे वितरण संदीप गुगळे ह्यांच्या हस्ते करण्यात आले . या वेळी संदीपजी गुगळे यांनी मंडळातर्फे होत असलेल्या कार्यक्रमाचे कौतुक केले .मंडळामार्फत देण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्याचा वापर नक्कीच मुले करतील असे प्रतिपादन मुख्याध्यापिका कल्पना सोनावणे यांनी केले .
या वेळी मंडळाचे अध्यक्ष सतीश लोहिया, निलेश अटल, गजानंद बिहानी , दीपेश मालाणी आदींसह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष नवले यांनी केले तर आभार कल्पना सोनवणे यांनी मानले .
Comments are closed