पिंपरी, दि. ११( punetoday9news):- पिंपळे गुरव मधील सामाजिक कार्यकर्ते माऊलीशेठ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या प्रेरणेतून व माजी नगरसेवक शंकरशेठ जगताप यांच्या मार्गदर्शनात सामाजिक कार्यकर्ते संजय मराठे यांच्या कडून जिल्हा रुग्णालय औंध कॅम्प व स्वर्गीय इंदिरा गांधी रुग्णालय जुनी सांगवी येथील रुग्णांना फळवाटप करण्यात आले.
याचबरोबर ममता अंध-अनाथ कल्याण केंद्र पिंपळे गुरव व सरस्वती अनाथ शिक्षण आश्रम दापोडी येथे अनाथ मुलांना फळवाटप व खाऊवाटप करण्यात आले.
पिंपळे गुरव मधील माऊलीशेठ जगताप यांचे सामाजिक क्षेत्रा मध्ये मोठे योगदान आहे. विविध सामाजिक उपक्रमातही त्यांचा नेहमीच सहभाग असतो. त्यांच्या कार्याकडे पाहून इतर सामाजिक कार्यकर्ते प्रेरणा घेतात असे संजय मराठे यांनी सांगितले.
यावेळी ओम साई फाउंडेशनचे अध्यक्ष संजय मराठे, रवि खोकर, पंकज सारसर, शैलेश थोरात, राजू आवळेकर,अमित दुर्वेकर तसेच हॉस्पिटल मधील डॉ.श्रद्धा कोकरे,डॉ.सुप्रिया बिरादार,परिचारिका सुवर्णा ताटे, संध्या जगताप,नीता पाटे, सविता नांगरे, सुषमा झांगरे, आयेशा शेख , कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
Comments are closed