दापोडी, दि. १२( punetoday9news):- संजय नाना काटे युवा मंच दापोडी यांच्या वतीने दापोडी येथे स्वामी विवेकानंद शाळेतील गुरुजनांचा सन्मान करण्यात आला.
प्रथम गुरुवर्य बा.ग.जगताप व स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्यास प्रशालेचे प्राचार्य कल्याणी कुलकर्णी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच गुरुवर्य पुरस्कार 2022 प्रदान करण्यात आला.
यावेळी मंगला बेंद्रे, मंगल हजारे, वर्षा खरात, पुष्पलता सोनवणे, बाळासाहेब भोसले, चंद्रकांत सोनवणे, बलभीम भोसले, राजश्री बिष्ट, वैशाली भालेराव, राजू रघावंत, अनिरुद्ध काळेल, प्रकाश आवटे, सुरेखा पाटोळे, संजय झराड, बाळासाहेब तापकीर, छाया खटावकर, ज्योती कदम, कविता कोलते यांना शाल श्रीफळ स्मृती चिन्ह संजय काटे यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
संजय काटे यांनी बोलताना गुरूंचा मान सन्मान केल्यास आपल्या जीवनात नेहमीच प्रगती होती गुरूंचा आशीर्वाद मिळाल्यास सर्व क्षेत्रांमध्ये आपणास मोठे स्थान मिळते गुरूंचा कधीही अपमान करू नये तर त्यांचा सन्मान करावा असे मनोगत संजय नाना काटे यांनी मानले.
जयवंत मोरे, लक्ष्मीकांत बाराते, विजय शिंदे, विलास काटे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल पाटील तर आभार कालीचरण पाटोळे यांनी मानले.
Comments are closed