पिंपळे गुरव, दि. १४( punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील कासारवाडी येथील श्री दत्त साई सेवा कुंज आश्रमात गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सामाजिक, अध्यात्म, आरोग्य अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना ‘गुरुगौरव सन्मान’ देऊन सन्मानित करण्यात आले.
बुधवार (दि १३) रोजी सकाळी होमहवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली, तसेच सायं ६ ते ८ भजन व हभप बाबा महाराज काडगावकर यांची कीर्तनरुपी सेवा झाली. यावेळी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमात ‘गुरुगौरव सन्मान’ गुलाबराव भिलारे ( स्ट्रक्चरल इंजिनियर ), बबनराव येडे ( उद्योजक ), राधाकिशन लाहोटी ( सीए ), ॲड . सखाराम कोळसे पाटील, प्रकाश काटे ( उद्योजक ), विजय सातपुते ( वृक्षसंवर्धन , घोराडेश्वर डोंगर ), प्रकाश मिटभाकरे , विजय उर्फ आप्पा रेणुसे ( शैक्षणिक व क्रीडा ), डॉ . किरण माकन ( वैद्यकीय क्षेत्र )
तसेच पंढरीच्या वारीमध्ये १५ दिवस वारकऱ्यांची आरोग्य सेवा करणाऱ्यांना ‘पंढरीची वारी आरोग्य सेवा सन्मान’ डॉ . देविदास शेलार, डॉ . मनीषा साबणे ( वैद्यकीय अधिकारी आदित्य बिर्ला हॉस्पिटल ), भाऊसाहेब जाधव, हरीचंद्र गायके तसेच पॅरामेडिकलच्या विद्यार्थ्यांना सन्मानीत करण्यात आले
Comments are closed