पिंपळे गुरव, दि. १५( punetoday9news):- मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त सामाजिक, सांप्रदायिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प , आणि तुळजाभवानीची प्रतिमा भेट देऊन सन्मानित करण्यात आले.
यामध्ये ज्येष्ठ नागरिक कृष्णाची त्र्यंबक खडसे, ह.भ.प. बाबुराव तांदळे महाराज, समाज प्रबोधनकार शारदाताई मुंडे, माजी महापौर शकुंतला धराडे, सूर्यकांत कुरुलकर, वामन भरगंडे, डॉ. भुजबळ, बळीराम माळी, ह.भ.प. विजुअण्णा जगताप, ह.भ.प. माऊली महाराज आढाव, नागेश जाधव आदी मान्यवरांना राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, राजू लोखंडे, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, उद्योजक बालाजी पवार यांच्या हस्ते तुळजाभवानीची प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले.
ह.भ.प. बाबुराव तांदळे महाराज म्हणाले, की कोरोना काळात जिवाभावाची माणसे डोळ्यासमोर गेली. जगात यापेक्षा भयान अवस्था कोणतीही नसेल. देव, संत आणि गुरूंच्या कृपेमुळे आज आपण सर्व सुरक्षित आहोत. पंढरपूरमधील जनसमुदाय पाहिल्यावर जीव आणि शिवाचे नाते अधोरेखित होते. असत्याकडून सत्याकडे आणि अंधाराकडून प्रकाशाकडे नेतात ते गुरु, असेही त्यांनी सांगितले.
समाज प्रबोधनकार शारदाताई मुंडे यांनी गुरु म्हणजे परीस आणि शिष्य म्हणजे लोखंड, अशा शब्दात गुरु-शिष्याचे नाते विषद केले. जे जे आपणास ठावे, ते दुसऱ्यासी देई, शहाणे करुन सोडी, सकळं जना, तोची गुरु खरा, आधी चरण तयाचे धरा, अशा शब्दात त्यांनी गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.
Comments are closed