पिंपळे गुरव, दि. १७ ( punetoday9news):-  सांगवी परिसर महेश मंडळातर्फे समाजउतप्ती दिनानिमित नुकतेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .

फोटो :  नृत्य सादर करताना महिला कलाकार

नवी सांगवी येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिरात आयोजित कार्यक्रमास शारदा सोनावणे , सुनील लोहिया , सतीश लोहिया, निलेश अट्टल, पंकज पंपालिया आदी उपस्थित होते .

या वेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस , एकल ,युगल नृत्य व समूह नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या . मुलांनी विविध सामाजिक विषयावर संदेश देणारे व्यक्तिमत्वाच्या वेशभूषा सादर केल्या. महिलांनी समूह नृत्याद्वारे राजस्थानी संस्कृती सादरीकरण केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज अटल व डिम्पल हेडा यांनी केले तर परीक्षक म्हणून विक्रांत देव्हारे, मयुरी काबरा यांनी भूमिका पार पाडली .

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दीपेश मालाणी, गणेश चरखा , गजानंद बिहाणी , पंकज टावरी , यांनी परिश्रम घेतले .

 

Comments are closed

error: Content is protected !!