सासवड : सासवड शहरातील भाजी मंडईचा अपुरा परिसर आणि मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी पाहता काही काळाकरीता हा बाजार दिवे येथे क्रीडासंकुलाच्या विस्तीर्ण साडे अकरा एकर क्षेत्रात भरवावा अशी सूचना माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केलेली आहे. तसा पत्रव्यवहार त्यांनी जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदार यांच्यासह सासवडचे मुख्याधिकारी विनोद जळक यांचेशी केलेला आहे.

याबाबत शिवतारे म्हणाले, “सासवडच्या बाजारात जागा अत्यंत अपुरी आहे. शेतकऱ्यांना शेतमालाची ओझी लांब उतरवून ती पुन्हा अंगाखांद्यावर आणावी लागतात. अशा वातावरणात सोशल डिस्टंसिंग राखता येणं शक्य नाही. याउलट क्रीडा संकुलाच्या जागेत बाजार हलवल्यास शेतकऱ्यांच्यात अंतर राखता येणं सहज शक्य आहे. त्यामुळे कोरोनापासून स्वतःचा बचाव करता येईल आणि मेहनतीने पिकवलेला शेतमाल वायाही जाणार नाही. एप्रिल महिन्यात जेंव्हा सासवडसह पुरंदरला कोरोनाचा लवलेशही नव्हता. तेंव्हा मी काही महत्वाच्या उपाययोजना सुचवल्या होत्या. त्याकडे गांभीर्याने पाहिले असते तर आज तालुका कोरोनामुळे इतका हतबल झाला नसता. निदान आता तरी राजकारण बाजूला ठेवून बाजाराच्या सूचनेची प्रशासन नीटनेटकी अंमलबजावणी करेल अशी आशा आहे.

Comments are closed

error: Content is protected !!