अर्ज करण्याचा पत्ता.
शेवटची तारीख २५ जुलै
जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.), डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सर्व्हे क्रमांक १०३,१०४, मेन्टल कॉर्नर, विश्रांतवाडी पोलीस ठाण्यासमोर, येरवडा, पुणे- ०६
पुणे, दि. १८ ( punetoday9news):- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत राबविल्या जाणाऱ्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात इयत्ता १० वी, १२ वी, पदवी, पदव्युत्तर वैद्यकीय व अभियांत्रिकी आदी अभ्यासक्रमामध्ये ६० टक्केहून अधिक गुण मिळवून विशेष प्राविण्य मिळालेल्या विद्यार्थ्यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी २५ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे तसेच, महामंडळाच्या अनुदान योजना व बीजभांडवल योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मांग, मातंग, मिनी मादिग, मादिंग, दानखनी मांग, मांग महाशी, मदारी, राधे मांग, मांग गारूडी, मांग गारोडी, मादगी, मादिगा या मातंग समाज व तत्सम पोटजातीतील विद्यार्थ्यांनी साध्या कागदावर छायाचित्र लावून अर्ज करावा.
अर्जावर भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करावा. सोबत जातीचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, शिधापत्रिका, गुणपत्रक, पुढील वर्गात प्रवेशाबाबत पुराव्याबाबतच्या स्वयंसाक्षांकित केलेल्या छायांकित प्रती जोडाव्यात.
अर्ज जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.), डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सर्व्हे क्रमांक १०३,१०४, मेन्टल कॉर्नर, विश्रांतवाडी पोलीस ठाण्यासमोर, येरवडा, पुणे- ०६ या कार्यालयाकडे आवश्यक त्या कागदपत्रांसह २५ जुलै पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.
याशिवाय महामंडळाकडून राबवण्यात येणाऱ्या ५० हजार रुपयेपर्यंत प्रकल्पमर्यादेची अनुदान योजना आणि ५० हजार १ ते ७ लाख रुपयेपर्यंत प्रकल्पमर्यादेच्या बीजभांडवल योजनेंतर्गत या समाजघटकातील गरजू होतकरू व्यक्तींनी व्यवसायासाठी कर्ज प्रस्ताव सादर करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
Comments are closed