वाढती महागाई, बेरोजगारीचं काय? 

पुणे. दि.२१( punetoday9news):-  काल काल मिळालेल्या ओबीसी आरक्षणावर आनंद साजरा करताना पुण्यामध्ये एक वेगळाच प्रकार पाहायला मिळाला. त्यामुळे काही वेळ कार्यकर्त्यांचीही भंबेरी उडाल्याचे दिसून आले.         भाजपचे कार्यकर्ते ओबीसी आरक्षण मिळाल्यामुळे आनंदोत्सव साजरा करण्यासाठी बालगंधर्व चौकात जमले असताना त्या ठिकाणी शेजारीच हिंदी गाण्यांचा कार्यक्रम पाहायला आलेल्या दोन महिला थबकल्या व त्यांनी महागाईच्या मुद्द्यावर काही प्रश्न उपस्थित केले अचानक आलेल्या महागाईच्या प्रश्नाने भाजपा कार्यकर्त्यांची मात्र काही वेळ भंबेरी उडाली.

आम्ही वेगळ्या विषयावर आनंदोत्सव साजरा करत असून यावेळी महागाईच्या प्रश्नावर चर्चा नको असे कार्यकर्त्यांकडून त्या महिलांना समजावण्यात आले.  मात्र समजावून घेतील तर पुणेरी महिला कसल्या ?  सदर महिला ह्या आपण अस्सल पुणेरी असून नवी पेठेत राहणाऱ्या आहोत असे ठणकावून सांगत होत्या तसेच आज प्रचंड महागाई वाढली असून घरगुती गॅस, पेट्रोल, डिझेल बेरोजगारी अशा प्रश्नांचं काय? असेही त्या म्हणत होत्या.

त्यामुळे एकीकडे आनंदोत्सव साजरा होत असताना दुसरीकडे नागरिकांना अनेक समस्याला सामोरे जावे लागत आहे हेही कार्यकर्त्यांनी लक्षात घ्यावे असा एक संदेशच त्यातून जणू त्या महिला देऊन गेल्या.

तर उपस्थित भाजप कार्यकर्त्यांनी त्या महिला राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षाने पाठवलेल्या महिला होत्या असा आरोप करण्यात आला आहे.

 

 

वाढत्या महागाईची झळ सर्वसामान्य नागरिकांना जाणवतेय का?

View Results

Loading ... Loading ...

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!