Loading ...
पुणे, दि. २३( punetoday9news):- शहीद सैनिकांच्या बलिदानाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी २३ वा कारगिल विजय दिवस २६ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता पुणे सैनिक कल्याण विभाग येथील हिरकणी सभागृहात आयोजित करण्यात येणार आहे.
यावेळी जिल्ह्यातील शहीद सैनिकांच्या वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता तसेच अपंगत्व आलेले जवान यांचा ‘एस. के. एफ. लिमीटेड’ व ‘बोनीसा वर्ल्ड’ या संस्थेकडून स्मृतीचिन्ह आणि ‘एक इंडिया मिशन रिंग’ भेट देऊन सत्कार करण्यात येणार आहे. या राष्ट्रीय कार्यक्रमास माजी सैनिक, विधवा यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सैनिक कल्याण विभागाचे प्रभारी संचालक लेफ्टनंट कर्नल रा. रा. जाधव यांनी केले आहे.
Loading ...
Comments are closed