हडपसर, दि.२३( punetoday9news):- महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विरोधी पक्षनेते व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या ६३ व्या वाढदिवसाचे औचित्त्य साधून पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे विधी महाविद्यालय, हडपसर येथे विविध कार्यक्रम राबवण्यात आले.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव संदीप कदम, खजिनदार मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहाय्यक सहसचिव ए. एम. जाधव व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रंजना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण पूरक उपक्रम म्हणून कानिफनाथ गडाच्या परिसरात प्लास्टिक संकलन व वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये एकूण 63 वृक्ष लावण्यात आल तसेच अण्णासाहेब मगर महाविद्यालय व विधी महाविद्यालय संकुलातही प्लास्टिक संकलन करण्यात आले.
त्याचबरोबर विधी महाविद्यालयांमध्ये वाद विवाद स्पर्धा ,वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रंजना पाटील प्रा सनोबर काझी, प्रा. शिवाजी बिबे,प्रा. संतोष सुतार, वैशाली भैरट ,किशोर इंगळे यांच्या उपस्थितीत महाविद्यालयातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी सर्व उपक्रमांमध्ये सहभाग घेतला.
Comments are closed