विशालनगर,दि. २४( punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे निलख मधील विशालनगर येथील डीपी रोड वरील दुकानदाराकडून दुकानासमोरील पदपथावरील मोठ्या झाडांची कत्तल केल्याचा प्रकार समोर आला होता.

याबाबत वृक्षमित्र व पर्यावरण प्रेमी चंद्रकांत ववले व सहकारी पिंपळवन निसर्ग संवर्धन संस्था यांनी याबाबत आवाज उघडल्याने या झाडांची कत्तल करणाऱ्या दुकानदारास पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कारवाईची नोटीस देण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार वॉर्ड क्रमांक 26 पिंपळे निलख मधील विशाल नगर भागामध्ये डीपी रस्ता येथील पदपथावरील झाडांची कत्तल तेथील अनधिकृत पत्रा शाॅप चालकाने केली. यात आतापर्यंत 5 मोठी झाडे तोडण्यात आल्याने पर्यावरणाची मोठी हानी झाली आहे.

याबाबत उद्यान विभाग व पोलीस स्टेशन मध्ये  तक्रारही दाखल करण्यात झाली आहे. त्यानुसार त्या दुकान चालकास 1 लाख रूपये दंड आकारल्याची नोटीस देण्यात आली आहे.

वाढत्या महागाईची झळ सर्वसामान्य नागरिकांना जाणवतेय का?

View Results

Loading ... Loading ...


Comments are closed

error: Content is protected !!