पिंपरी,२४( punetoday9news):- पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील ‘क’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक २ जाधव वाडी कुदळवाडी चिखली देहू आळंदी रस्त्यालगत च्यां मोई फाटा येथील गट नंबर १४ व १५ येथील २२००० स्क्वेअर फुट एरियाचे ४४ अनधिकृत कमर्शियल पत्रा शेड व २००० स्क्वेअर फुट एरियाचे १ अनधिकृत कमर्शियल आरसीसी बांधकामा वर निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
आयुक्त राजेश पाटील व अतिरिक्त आयुक्त जितेन्द्र वाघ यांच्या निर्देशानुसार शहरात अतिक्रमण व अनधिकृत पत्रा शेड वर कारवाई करण्यात येत असून शनिवारी ही कारवाई सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्या नियंत्रणाखाली करण्यात आली.
प्रशासन अधिकारी नाना मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अतिक्रमण पथक प्रमुख संतोष शिरसाठ, बीट निरिक्षक प्रसाद आल्हाट, योगेश शेवलकर व क प्रभाग अतिक्रमण पथक , महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, महाराष्ट्र पोलीस यांच्या पथकाने केली.
Comments are closed