बारामती, दि. २५(punetoday9news):- पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी येथे बारामती मधील कार्व्हर एव्हिएशनचे एक शिकाऊ विमान कोसळल्याची घटना घडली आहे .

या दुर्घटनेत वैमानिक भावना राठोड या जखमी झाल्या असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बारामतीत कार्व्हर एव्हिएशन मार्फत पायलट प्रशिक्षण दिले जाते. याच विमानाची शिकाऊ पायलट भाविका राठोड  सराव करत असताना सकाळी बारामतीतून या विमानाने उड्डाण केले मात्र काहीच वेळानंतर तांत्रिक बिघाड झाल्याने विमान इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी गावातील बारहाते यांच्या शेतात कोसळले

ही दुर्घटना घडल्यावर परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती. तेथील घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी वैमानिक भाविका राठोड या तरुणीला विमानाच्या बाहेर काढले. पायलटला किरकोळ जखमा झाल्या असून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.  कारवार एव्हिएशनच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.

 

 

Comments are closed

error: Content is protected !!