वाढत्या महागाईची झळ सर्वसामान्य नागरिकांना जाणवतेय का?

View Results

Loading ... Loading ...

चिंचवड, दि.२८ ( punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड येथे महात्मा जोतीबा फुले मंडळ , चिंचवडगाव यांच्या वतीने श्री संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. 

 

कार्यक्रमाची सुरुवात संत शिरोमणी सावता महाराजांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली.  यावेळी ह.भ.प. महादेव महाराज यांचे प्रवचन झाले. त्यानंतर सर्वांसाठी शुगर व हिमोग्लोबीन तपासणी करण्यात आली.  तसेच महिलांसाठी आरोग्य विषयक मार्गदर्शन व आरोग्य तपासणी करण्यात आली.  डॉ . माधुरी आल्हाट , डॉ . अर्चना क्षिरसागर, डॉ . विजय सातव , डॉ . हेमंत क्षिरसागर यांनी सहभाग नोंदवला. 

 तसेच शनिवार दि.३० रोजी विद्यार्थी गुणगौरव व पुरस्कार सोहळा साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात येणार असून त्याचबरोबर संत सावता भूषण पुरस्कार हा निवृत्ती उर्फ आप्पा बोराटे यांना व  “ फुले दांम्पत्य पुरस्कार ” , धनंजय वर्णेकर व शितल वर्णेकर यांना मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहे. 

 

वाढत्या महागाईची झळ सर्वसामान्य नागरिकांना जाणवतेय का?

View Results

Loading ... Loading ...

 

Comments are closed

error: Content is protected !!