● टीबी वॉर रुमचे उद्घाटन.

पुणे, दि. ३०( punetoday9news):- नियोजन, अंमलबजावणी, संनियंत्रण, पाठपुराव्याद्वारे क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाचे गाव पातळीपर्यंत विकेंद्रीकरण करुन या कार्यक्रमात लोकसहभाग घेण्याचे आवाहन राज्याचे आरोग्य सेवा आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी केले.

आरोग्य सेवा आयुक्त डॉ.रामास्वामी एन. यांच्या हस्ते येथे उभारण्यात आलेल्या क्षयरोग अंमलबजावणी कक्षाचे (वॉर रुम) उदघाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. आरोग्य सेवा संचालक डॉ.नितीन आंबाडेकर, सहसंचालक डॉ. रामजी अडकेकर, सी.एच.आई फौंडेशनच्या श्रीमती अनन्या व बी.एम.जी.एफ फौंडेशनचे डॉ.संदीप भारस्वाडकर, डॉ.समीर कुमटा आदी उपस्थित होते.

डॉ. रामास्वामी म्हणाले, क्षयरोग निर्मुलनाचे उद्दिष्ट २०२५ पर्यंत साध्य होण्यासाठी शासकीय, खाजगी आणि स्वयंसेवी संस्था यांनी एकत्र प्रयत्न करावा.

केंद्रीय क्षयरोग निर्मूलन विभागाकडे सुसज्ज अंमलबजावणी कक्ष उपलब्ध आहे. बिल ॲण्ड मेलिंडा गेट्स फौंडेशन व क्लिंटन हेल्थ एक्सेस इनिशिएटिव्ह यांच्या सहकार्याने उभारण्यात आले आहे. राज्यस्तरीय क्षयरोग अंमलबजावणी कक्ष (वॉर रूम) तयार करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे.

क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत निगडित सर्व डेटा तयार करण्यात येऊन कार्यक्रमात येणाऱ्या अडी-अडचणी, नियोजन व सहयोगी विचारमंथन करून त्यातून कार्यक्रमाच्या चांगल्या नियोजनासाठी याची मोठी मदत होणार आहे. यात खाजगी, शासकीय व स्वयंसेवी संस्थांच्या कार्यांचा आढावा घेऊन त्या नुसार कार्यप्रणाली अद्यावत करण्यावर भर दिला जाणार आहे. या कार्यप्रमाणालीद्वारे जिल्हा व तालुक्यांशी थेट संवाद होऊन दैनंदिन कामकाजात गतिमानता येणार असून गुणवत्ता व सुधार करण्यासाठीच्या कृती करण्याकडे कल निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त करण्यात आला.

क्षयरोग अंमलबजावणी कक्ष
क्षयरोग निर्मुलनासाठी महाराष्ट्र राज्यात उपलब्ध असणाऱ्या भौतिक सुविधांचा प्रभावी वापर करून कार्यक्रमाची अंबलबजावणी केल्यास निरंतर चांगले कार्य करण्याकरीता या वॉर कक्षाद्वारे संबंधित आकडेवारी उपलब्ध होणार आहे. नियमित विश्लेषण तसेच पाठपुरावा करून, प्रभावीपणे कार्य होण्यासाठी याची मदत होईल. कार्यक्रमाशी संबंधित सर्व माहिती, सूचना, निदानात्मक सुविधा, उपचारात्मक सुविधा, डी.बी.टी योजना यांच्या विषयी रोजच्या रोज माहिती मिळून यात येणाऱ्या अडी-अडचणींविषयी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार आहे. निक्षय अहवाल व व्यवस्थापन अहवाल मिळवणेही यामुळे अधिक सोपे होणार आहे.

क्षयरोग निर्मुलन कार्यक्रम हा जिल्हा, तालुका व गाव पातळीवर अधिक सक्षम होणार असून नियोजन अंमलबजावणी, शासकीय, खाजगी आणि स्वयंसेवी संस्था यांचा सहभाग वाढवून गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी आणि संनियंत्रण पाठपुरावा यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.

वाढत्या महागाईची झळ सर्वसामान्य नागरिकांना जाणवतेय का?

View Results

Loading ... Loading ...

 

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!