मुंबई, दि. ३( punetoday9news):- राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकांबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुका या 2017 सालाच्या प्रभाग रचनेप्रमाणेच घेण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

त्यामुळे महाविकास आघाडीने प्रभाग रचनेबाबत घेतलेले निर्णय रद्द ठरवण्यात आले आहे. महाविकास आघाडी सरकारने वाढविलेले वॉर्ड संख्या नियमबाह्य पद्धतीने केली असल्याचा दावा करत रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 2011 सालाच्या जनगणनेनुसार 2017 साली वॉर्ड संख्या ठरली होती तीच यंदाच्या निवडणुकीत कायम राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुंबईत काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडी सत्तेत असताना प्रभाग रचनांच्या मुद्द्यावरुन राजकीय पक्षांमध्येच मोठा गदारोळ बघायला मिळाला होता. महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी प्रभाग रचना जाहीर करण्यात आली होती. पण या प्रभाग रचनेवरुन मोठा राजकीय गदारोळ बघायला मिळाला होता. विशेष म्हणजे महाविकास आघाडीतही बिघाडी झालेली बघायला मिळाली होती. कारण काँग्रेस नेत्यांनी प्रभाग रचनेविरुन शिवसेनेवर टोकाची टीका केली होती. विशेष म्हणजे काँग्रेस नेत्यांनी प्रभाग रचनेच्या मुद्द्यावरुन न्यायालयाची देखील पायरी चढली. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाली का? अशा चर्चांना उधाण आले होते. शिवसेनेने स्वत:च्या पक्षाच्या फायद्यासाठी वॉर्ड रचना केल्याचा आरोप करण्यात आला होता. विशेष म्हणजे मुंबईतल्या वॉर्ड रचनांच्या मुद्द्यावरुन चर्चा करण्यासाठी काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी काल राज्याचे  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत 2017 चीच वॉर्ड रचनेनुसार निवडणूक होणार असल्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!