पुणे, दि. ४( punetoday9news):-  विविध कल्याणकारी योजना ऑनलाइन अर्ज नोंदणी दि .१ ऑगस्ट ते ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत मनपाच्या www.pcmcindia.gov.in या 

https://www.pcmcindia.gov.in/marathi/department-data.php?Id=20

वेबसाईटवरील समाज विकास विभाग योजना या पर्यायावरून वरील दिलेल्या मुदतीत भरता येतील.

१) इ . १० वी मध्ये ८० % ते ९०% गुण संपादन केलेल्या महाराष्ट्र राज्य मंडळ SSC बोर्ड अंतर्गत शाळांतील विद्यार्थी – विद्यार्थीनींना बक्षीस रक्कम – रुपये १०,०००

२) इ . १० वी मध्ये ९०% पेक्षा जास्त गुण संपादन केलेल्या महाराष्ट्र राज्य मंडळ SSC बोर्ड अंतर्गत शाळांतील विद्यार्थी – विद्यार्थीनींना बक्षीस रक्कम – रुपये १५,०००

३) इ . १२ वी मध्ये ९०% गुण संपादन केलेल्या महाराष्ट्र राज्य मंडळ HSC बोर्ड अंतर्गत शाळांतील विद्यार्थी – विद्यार्थीनींना बक्षीस रक्कम – रुपये १५,०००

४) इ . ८ वी ते १० वी मधील विद्यार्थी – विद्यार्थिनींना सायकल घेणेसाठी अर्थसाहाय्य – रुपये ७,०००

५) इ .१२वी नंतरचे ( प्रथम वर्ष ) वैद्यकीय आणि अभियांत्रिकी पदवी परीक्षा उच्च शिक्षण घेण्यासाठी अर्थसाहाय्य रुपये – २५ ,०००

६) परदेशातील उच्चशिक्षण / अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या युवक व युवतींना ( प्रथम वर्षाकरिता ) अर्थसहाय्य – रुपये १,५०,०००

७) दिव्यांग विद्यार्थ्यांना १२ वी नंतरचे वैद्यकीय आणि अभियांत्रिकी पदवी परीक्षा ( प्रथम वर्षासाठी ) सारखे उच्च शिक्षण घेण्यासाठी अर्थसहाय्य – रुपये १,००,०००

८) विधवा / घटस्फोटित महिलांना किरकोळ घरगुती व्यवसाय करण्यासाठी मनपाकडून व्यवसाय कौशल्य प्रशिक्षण घेतले असल्यास अर्थसहाय्य – रुपये २५ ,००० व घेतले नसल्यास – रुपये १५,०००

९) कोरोना प्रादुर्भावाच्या काळात विधवा झालेल्या महिलांना अर्थ सहाय्य -रुपये २५ ,०००

१०) सहा महिने पूर्ण झालेल्या महिला बचतगटास अर्थसहाय्य – रुपये १५,०००

११) दोन वर्ष पूर्ण झालेल्या महिला बचतगटास अर्थसहाय्य – रुपये १५ ,०००

१२) दिव्यांग व्यक्तींना व्यवसायासाठी अर्थसहाय्य – रुपये १,००,०००

१३) दिव्यांग व्यक्तींना दरमहा अर्थसहाय्य – रुपये २,५००

१४) कुष्ठपीडीत व्यक्तींना दरमहा अर्थसहाय्य – रुपये ३,०००

१५) मतिमंद व्यक्ती / सांभाळ करणाऱ्या संस्थेस /पालकांस दरमहा अर्थसहाय्य – रुपये ३,०००

१६) तृतीयपंथी ( वय वर्षे ५० पुढील )पेन्शन दरमहा रुपये – ३,०००

१७) सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वधू – वरासाठी अर्थसहाय्य – रुपये १५ ,०००

१८) नोंदणीकृत महिला संस्था – मनपाकडील नोंदणीकृत अनुदान प्राप्त महिला बचतगटांना पाळणाघर सुरु करण्याकरिता अर्थसाहाय्य -रुपये १०,०००

१९) बेटी बचाव बेटी पढाओ – पहिल्या मुलीवर कुटूंबनियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या महिलेस अर्थसहाय्य रुपये – २५,०००

२०) दिव्यांग व अव्यंग जोडप्यांना विवाहासाठी अर्थसाहाय्य – रुपये १ ,००,०००

२१) पिंपरी चिंचवड शहरात स्थायिक असलेल्या परिवारातील जवान शहीद झाल्यास त्याच्या कुटुंबास आर्थिक मदत रुपये –
५ ,००,०००

२२) मनपा हद्दीतील सार्व. संस्था / ट्रस्ट , मतिमंद , अंध, कुष्ठरोगी , मूकबधिर, वृद्धाश्रम , अनाथालय संस्थाना अनुदान रुपये – २ ,९९,०००

 

https://www.pcmcindia.gov.in/marathi/department-data.php?Id=20

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!