पिंपरी, दि.५ ( punetoday9news):- महात्मा जोतिबा फुले मंडळ पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रम व विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम संपन्न झाला.
त्यावेळी बोलताना आखाडे यांनी संत सावता महाराज यांच्या श्री श्रेत्र अरण गावच्या विकासासाठी समाजाने जागृत होऊन पुढाकार घेतला पाहिजे तसेच सर्व संताच्या पालख्या पंढरपूरला जातात परंतु पंढरपूरच्या विठूरायाची पालखी संत सावता महाराजांच्या गावी अरणला येते .या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे प्रतिपादन केले .
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे कामगार आयुक्त रविराज इळवे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना करिअर निवडीसाठी मोलाचे मार्गदर्शन केले. याप्रसंगी चित्रपट निर्माते आप्पा बोराटे यांना त्यांच्या आध्यात्मिक, कृषी व सामाजिक कार्यासाठी सावता भूषण तर डॉ. धनंजय वर्णेकर व सौ शीतल वर्णेकर यांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यासाठी फुले दांम्पत्य पुरस्कार प्रदान करण्यात आला .
या वेळी राष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडूंना व दहावी .बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व शालेय बॅग देऊन गौरविण्यात आले. मंडळाच्या वतीने महिलांसाठी आरोग्य शिबीर आयोजित केले होते. त्यामध्ये महिलांनी मोठा सहभाग नोंदवला. कार्यक्रमासाठी माजी महापौर अपर्णा डोके, राहुलदादा जाधव, जेष्ठ नेते वसंतनाना लोंढे, स्थायी समिती माजी सभापती संतोषआण्णा लोंढे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा कविता आल्हाट, नगरसेवक वसंत बोराटे, नगरसेविका संगीताताई ताम्हाणे, रेखाताई दर्शले, नगरसेविका भारतीताई फरांदे, दिशा सोशल फाउंडेशनचे कार्याध्यक्ष राजेंद्र कर्पे आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष हणमंत माळी यांनी केले. अहवाल वाचन सुर्यकांत ताम्हाणे यांनी तर आभार महादेव महाराज भुजबळ यांनी मानले .
सूत्रसंचालन ऋतुजा चव्हाण व डॉ .पोर्णिमा कोल्हे यांनी केले .
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विश्वास राऊत, अनिल साळुंके, राजेंद्र बरके, नरहरी शेवते, अमर ताजणे आदि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
Comments are closed