पुणे, दि. ५( punetoday9news):- सतत ट्रॅफिक जाम व खड्डेमय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे-सातारा महामार्गाची खासदार सुप्रिया सुळेंनी दखल घेवून याबाबत नीतिन गडकरींकडे ट्विट द्वारे तक्रार केली आहे.
यात त्या म्हणाल्या कि,त
पुणे-सातारा महामार्गाची ठिकठिकाणी दुरवस्था झाली असून या रस्त्याची डागडुजी-दुरुस्तीसह तेथे सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याची गरज आहे. पुणे शहरातून जाताना सिंहगड रस्त्यादरम्यान नवले पुलाशेजारी तर अक्षरशः अपघातांची मालिका चालू असल्याने समस्येवर गंभीर विचार करून उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. तसेच अनेक ठिकाणी खड्डेमय मार्ग असल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते.
यासंदर्भात त्यांनी वरील ट्वीट केले आहे. यापूर्वीही त्यांनी वारंवार यासंदर्भात केंद्र सरकारकडे या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत पाठपुरावा केला आहे.
मात्र यापूर्वीही अनेक वेळा प्रवासी, नागरिकांनी या महामार्गाच्या दर्जाबाबत तक्रारी व उघड नाराजी व्यक्त केली आहे. तरीही यावर सुधारणा न होता या संबधित प्रशासन ढिम्म पणे हातावर हात ठेवून बसल्याचेच दिसून आले आहे. आता यावर कारवाई करत सर्व सुधारणा होणार का? मागचेच दिवस पुढे? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
Comments are closed