नवी सांगवी,दि. ६( punetoday9news):- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने सांगवीतील घोलप माध्यमिक विद्यालयात हर घर तिरंगा, फ्रेंडशिप विथ कॉप्स कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सदरचा कार्यक्रमासठी डॉ. अंकुश शिंदे सी.पी , संजय शिंदे जॉइंट सी.पी, आनंद भोईटे डीसीपी, श्रीकांत दिसले एसीपी वाकड यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवी पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल टोणपे, मिनिनाथ वरुडे पोलिस उप निरीक्षक यांनी मार्गदर्शन करून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने राबवण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा उपक्रमाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली .
हा उपक्रम शाळेत, घरी व समाजात राबवण्याबाबत प्रोत्साहित करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांची प्रभात फेरीही काढण्यात आली. सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणावर होत असलेली ऑनलाइन बँकिंग फसवणुक, सोशल मीडियाचा गैरवापर,अल्पवयीन मुलांकडून होत असलेले गुन्हे व निर्व्यसनी राहण्याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच वाढत्या गुन्हेगारी व संकटकाळी मदतीसाठी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे यांनी केले.
यावेळी प्राचार्य मापारी, शिक्षक तसेच ८ थी ते १२ वीतील विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते.
Comments are closed