● मुख्यमंत्री, प्रधानमंत्री जनतेतून निवडावा
● सर्वांना मंत्रिपदाचं गाजर दाखवलं का ?
● अजुनही घोळ मिटेना; लवकरच विस्तार होणार म्हणताय पण कधी? आता एक महिना होवूनही प्रतिक्षाच.
● शिंदे- फडणवीस सरकारने लोकशाहीचा मुडदा पाडला.
पिंपरी, दि.६( punetoday9news):- पिंपरी-चिंचवड मध्ये राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी राज्य सरकार व केंद्र सरकारवर सडकून टीका केली.
यामध्ये महागाईच्या मुद्द्याला महत्त्व देत केंद्र सरकारने विविध प्रकारे सामान्य जनतेच्या खिशाला कात्री लावली असल्याची बाबही त्यांनी निदर्शनास आणली. ते म्हणाले की, पेट्रोल, डिझेल व सीएनजीचे दर हे समसमान करून टाकल्याने सर्वसामान्य चाकरमान्यांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. एवढेच नव्हे तर ट्रकचालक, रिक्षाचालक, टॅक्सीचालक, व्यावसायिक यांना फटका बसल्याने जगणे मुश्किल झाले आहे.
जे अधिकार तुम्ही अधिकारी, आयुक्ताला देता तसेच अधिकार मुख्य सचिवांना द्या असेही त्यांनी सुनावले. शिवसेना जेव्हा जेव्हा फुटली तेव्हा शिवसेना सोडलेले कुणीही परत निवडून आले नाही असा उपरोधिक टोलाही दिला. लोकशाहीच्या नियमांना डावलून हे सरकार अस्तित्वात आले असल्याचेही ते म्हणाले तसेच सरकार चा लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे असे वारंवार बोलूनही कुठल्याही प्रकारे अजून विस्तार न झाल्याने सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत असेही ते म्हणाले तसेच खूप जणांना मंत्रिपदाचे आश्वासन दिले असावे त्यामुळे कदाचित तो गूळ मिळत नाही असे असू शकते अशी टीकाही त्यांनी केली.
त्यामुळे यापुढे राज्यातला सरकार विरोधी संघर्ष हा टोकाचा होणार हे यातून दिसून येत आहे.
Comments are closed