पिंपरी, दि. ८( punetoday9news):- देहू परिसरात यंदा पावसाने ओढ दिल्याने लांबलेली भात लागवड ही मागील दोन-तीन दिवसात आलेल्या पावसामुळे पुन्हा सुरू झाली. 

देहू माळवाडी परिसरातील परंडवाल आळी येथे एका शेतात टिपलेले छायाचित्र

पावसाने तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून उघडीप दिली होती व कडक ऊनामुळे माळरानावरील भात खाचरे कोरडी पडली होती .  पश्चिम पट्ट्यातील बहुतांशी लागवड उरकली असली तरी पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेले शेतकरी मात्र काहीसे चिंताग्रस्त होते.

पावसाच्या प्रदीर्घ उघडीपीनंतर पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होत आहे आणि म्हणूनच शेतकऱ्यांची देखील भात लागवडी साठी लगबग सुरू झाली आहे.

 

 

Comments are closed

error: Content is protected !!