सांगवी, दि. ८( punetoday9news):- युवा स्पंदन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जागतिक मैत्री दिन पुणे शहरातील पोलिस स्टेशनमधील अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांसोबत साजरा करण्यात आला.
युवा स्पंदन संस्था पुणे शहर व जिल्ह्यामध्ये कार्यरत असून विविध सामाजिक , विधायक उपक्रमांचे आयोजन करत असून मैत्री दिनाच्या निमित्ताने पोलीस बांधवांसोबत मैत्री दिन साजरा करण्यात आला.
या उपक्रमामागचा मुख्य हेतू तरुणाई, सामान्य नागरिक व पोलिस यांच्यात मैत्री पूर्ण संबंध प्रस्थापित करणे, सुसंवाद घडवणे हा होय. हा उपक्रम पुणे शहरातील विविध पोलिस स्टेशन मध्येही साजरा करण्यात आला .
यावेळी योगेश क्षिरसागर , तेजश्री कदम , आदित्य राऊत, चिराग शेंडे, युवराज कुलकर्णी, काजल कदम ,रितेश ढोबळे, योगेश आमलेकर, ओंकार शेंडगे, मनोज गणेशवाडे , कृष्णा ढोरे , आदर्श सोनवणे, सुहासराज महाडिक उपस्थित होते.
Comments are closed