पुणे, दि. ९( punetoday9news):- महाराष्ट्रातील राजकारणात रोज नवीन घडामोडी घडत असल्याचे चित्र असताना आजच्या शपथविधीने नवीन विषयाला पुन्हा सुरूवात झाली आहे. संजय राठोड यांचा शपथविधी झाल्याने आता भाजपचेच काही नेते तोंडघशी पडले आहेत. त्यामुळे यावर उत्तर देताना त्यांना सारवासारव करावी लागत आहे.
महाराष्ट्रातील राजकारणात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडी सरकार मधील मंत्री संजय राठोड यांना पूजा चव्हाण प्रकरणात आपले मंत्रिपद गमवावे लागले होते. तसेच या आरोपावरून सरकारचीही मोठी नाचक्की झाली होती आता नवीन सरकारमध्ये त्यांनाच पुन्हा कॅबिनेट मध्ये स्थान मिळाल्यामुळे एकेकाळी आक्रमकपणे भूमिका मांडत संजय राठोड यांना विरोध करणाऱ्या चित्रा वाघ, प्रवीण दरेकर तसेच भाजपचे इतर वरिष्ठ नेते तोंडघशी पडल्याचे चित्र बनले आहे.
त्यामुळे आता अन्याय करणाऱ्या विरुद्ध आपण आवाज उठवत होतो तर आता तो अन्याय करणारा अचानक बदलला कसा? अशा प्रतिक्रिया सामान्य स्तरातून उठत आहेत. तसेच स्वच्छ सरकार स्वच्छ कारभार म्हणून देवेंद्र फडणीस यांचा उदाहरण देणाऱ्या इतर भाजपा नेत्यांनाही या विषयास बगल द्यावी लागणार आहे.
स्वतः चित्रा वाघ यांनीही स्वतःची बाजू मांडताना माझा लढा चालूच राहील असे म्हटले आहे त्यामुळे आता यानंतर संजय राठोड यांचाही मार्ग खडतर राहणार हे दिसून येत आहे.
पुजा चव्हाण च्या मृत्युला कारणीभूत असणार्या माजी मंत्री संजय राठोड ला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे
संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे
माझा न्याय देवतेवर विश्वास
लडेंगे….जितेंगे 👍 @CMOMaharashtra pic.twitter.com/epJCMpvHLB— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) August 9, 2022
शिवसेनेच्या मनिषा कायंदे यांनीही याच विषयावर लढण्याचे जाहीर आवाहन केले आहे.
चित्राताईना जाहीर आव्हान pic.twitter.com/KXVyHHWcLa
— Dr.ManishaKayande (@KayandeDr) August 9, 2022
तर काँग्रेस चे सचिन सावंत यांनी ही भाजपा शिंदे गट सरकारमध्ये संजय राठोड असल्याने त्यांचे डाग धुतले गेले अशी टीका केली आहे.
भाजपानेच उडवलेला चिखल साफ धुण्याचे तंत्रज्ञान असलेली वॉशिंग मशीन भाजपा कडेच आहे हे आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात ही स्पष्ट झाले
विजयकुमार गावित, संजय राठोड यांच्यावर भाजपानेच आरोप केले होते— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) August 9, 2022
राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी आजच्या शपथविधी वर बोलताना म्हटले की एकाही महिलेला स्थान न मिळणे हे दुर्दैवी आहे.
राज्यातील अनेक नेते जे कधी काळी आमच्यासोबत होते त्यांना भाजपने मंत्रिपदाची संधी दिली आहे. मात्र आज झालेल्या १८ मंत्र्यांच्या शपथविधीत एकाही महिलेला स्थान नाही, हे दुर्दैवी असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार @supriya_sule यांनी केली आहे. pic.twitter.com/x6rJbq2DKu
— NCP (@NCPspeaks) August 9, 2022
तर काही व्यक्तींनी देवेंद्र फडणवीस यांचा विधिमंडळातीलच व्हिडिओ शेअर करत संजय राठोड यांना मंत्री केल्याविषयीचा रोष व्यक्त केला आहे.
पूजा चव्हाण प्रकरणात सर्व पुरावे असताना पोलिस गुन्हा दाखल करणार नसतील, तर निलंबित करा त्या अधिकाऱ्याला!
(राज्यपाल अभिभाषणातील चर्चा । महाराष्ट्र विधानसभा । दि. 2 मार्च 2021) pic.twitter.com/apEnFiqq20— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 2, 2021
त्यामुळे आता यापुढे सरकारचा मार्ग हा नक्कीच खडतर ठरणार असे मानले जात आहे.
Comments are closed