पिंपरी, दि. ९ ( punetoday9news):- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी नगरसेवक गोपाळ माळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनात व माजी नगरसेवक शंकरशेठ जगताप यांच्या नेतृत्वात विमल गार्डन येथे चिंचवड विधानसभा मतदारसंघातील दिव्यांग, अनाथ अशा अनेक प्रकारच्या गरजू नागरिकांना संजय गांधी निराधार योजना समिती कडून 145 लाभार्थ्यांना दरमहा पेन्शन पत्र तर 200 नागरिकांना तहसील उत्पन्नाचे दाखल्याचे वाटप करण्यात आले.
माजी नगरसेवक शंकरशेठ जगताप, माजी महापौर माई ढोरे, प्रसिद्ध उद्योजक विजूशेठ जगताप, माजी नगरसेविका सविता खुळे, माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते, बाबासाहेब त्रिभुवन, अभिषेक बारणे, कैलास थोपटे, महेश जगताप, संदीप गाडे, विनोद तापकीर, संदीप नखाते, विभीषन चौधरी, देविदास पाटील, सामाजिक कार्यकर्ते नरेश खुळे, गणेश नखाते, श्रीमंत शितोळे यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यावेळी माजी नगरसेवक शंकरशेठ जगताप यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व माजी स्विकृत नगरसेवक गोपाळ मळेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि संजय गांधी निराधार योजना समितीचे सर्व सदस्यांनी आज वर चिंचवड विधानसभा मतदार संघात साडे पाच हजार लोकांना पेन्शन मिळवून दिली आहे म्हणून त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल शुभेच्छा दिल्या. त्याप्रसंगी संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष नरेंद्र माने, संजय मराठे, दिलीप गडदे, शिवाजी कदम, नेताजी नखाते, माधव मनोरे, दिलीप जाधव, विजय कांबळे, रणजीत घुमरे, संतोष जगताप आधी मान्यवर व योजनेचे लाभार्थी नागरिक उपस्थित होते.
गोपाळ मळेकर, संजय मराठे, सुरेश देडुंदा, रवि खोकर, पंकज सारसर यांनी उपस्थित नसलेल्या लाभार्थ्यांना घरपोच पेन्शनपत्र दिले.
Comments are closed