पिंपरी, दि. ११( punetoday9news):-  पवना धरणातील पाणी साठा आज सां. ९५.८०% इतका झालेला असल्यामुळे सध्या विद्युत र्निमिती गृहाद्वारे १४०० क्युसेक विसर्ग साेडण्यात येणार आहे व धरणाच्या पाणलाेट क्षेत्रातुन येणारा पाण्याचा येवा चे प्रमाण पाहुन रात्री १०.०० वाजता धरणाच्या सांडव्या द्वारे २००० क्युसेक विसर्ग साेडण्यात येणार आहे .
तरी धरणाच्या खालील बाजूकडील नदी तिरावरील गावांमधील नागरिकांनी सावधगिरी बाळगावी व नदी पात्रात व लगत असलेली सर्व साधन सामुग्री व जनावरे सुरक्षित ठीकाणी हलविण्यात यावी जेणे करून कुठल्याही प्रकारची वित्त व जिवीत हानी हाेणार नाही याची दक्षता घेऊन जलसंपदा विभास
सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

वाढत्या महागाईची झळ सर्वसामान्य नागरिकांना जाणवतेय का?

View Results

Loading ... Loading ...

 

 

Comments are closed

error: Content is protected !!