पुणे ,दि. १२( punetoday9news):-  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १३ ते ऑगस्ट या कालावधीत शासनाच्या सूचनेनुसार ‘ हर अभियानांतर्गत राष्ट्रध्वज फडकविताना नागरिकांनी काय काळजी घ्यावी , जेणेकरून राष्ट्रध्वजाचा अपमान होणार नाही ,  ध्वजसंहिता माहिती नसल्यामुळे नागरिकांकडून चुका होण्याची शक्यता आहे . त्या टाळण्यासाठी ही नियमावली

हे नियम पाळा

घरोघरी तिरंगा या उपक्रमांतर्गत राष्ट्रध्वज फडकविताना हाताने काढलेल्या , विणलेल्या किंवा मशिनद्वारे सूत , पॉलिस्टर , सिल्क , खादी , लोकरपासून तयार केलेला वापरावा .

राष्ट्रध्वज हा ३ : २ या प्रमाणात असावा केशरी रंग वरच्या बाजूने आणि हिरवा रंग जमिनीच्या बाजूने राहील याप्रमाणे फडकवावा . 

राष्ट्रध्वज उतरवताना सावधतेने व सन्मानाने उतरवून सुरक्षित ठिकाणी ठेवावा . 

राष्ट्रध्वज कोणत्याही पद्धतीने फाटणार नाही याची काळजी घ्यावी .

या गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात .

प्लास्टिक किंवा कागदी ध्वज वापरू नये . कोणत्याही सजावटी वस्तू लावू नयेत . 

राष्ट्रध्वज फडकवितेवेळी फुलांच्या पाकळ्या ठेवू नयेत . राष्ट्रध्वजावर कोणत्याही प्रकारचे अक्षर किंवा चिन्ह काढू नये .

राष्ट्रध्वज फाटलेला , मळलेला अथवा चुरगळलेला लावण्यात येऊ नये . एकाचवेळी इतर ध्वजांसोबत एकाच काठीवर राष्ट्रध्वज फडकवू नये . 

तसेच तोरण , गुच्छ अथवा पताका म्हणून अन्य कोणत्याही प्रकारच्या शोभेसाठी राष्ट्रध्वजाचा उपयोग करू नये .

 

वाढत्या महागाईची झळ सर्वसामान्य नागरिकांना जाणवतेय का?

View Results

Loading ... Loading ...

 

 

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!