पिंपळे गुरव, दि. १३ ( punetoday9news):-  नाते जिव्हाळ्याचे…… कार्य समृद्धीचे! उक्तीप्रमाणे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली  माजी नगरसेवक शंकर जगताप यांनी धम्मरत्न गायकवाड या गुणवंत विद्यार्थ्याला जपानमध्ये शिक्षणासाठी मिळालेल्या स्कॉलरशिप बद्दल त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

दापोडी येथील एका सामान्य कुटुंबात राहणारा धम्मरत्न गायकवाड हा संपूर्ण भारतात 92 लाखाची स्कॉलरशिप मिळवणारा या वर्षीचा एकमेव विद्यार्थी ठरला आहे.

धम्मरत्न गायकवाड याने ही स्कॉलरशिप मिळवून भारता मध्ये आपल्या पिंपरी-चिंचवड शहराचे नाव मोठे केले आहे. जपान मध्ये शिक्षणाला गेल्यानंतर तेथे कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास आम्ही सदैव त्यांना मदत करू असे आश्वासन माजी नगरसेवक शंकर जगताप यांनी दिले.
यावेळी माजी नगरसेवक शशिकांत कदम, सागर आंघोळकर, महेश जगताप, सोमनाथ काटे, गणेश सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय जगताप, संजय गांधी निराधार योजनेचे समिती सदस्य संजय मराठे, शिवाजी कदम, अनिल कांबळे, धम्मरत्न गायकवाड यांची आई निता देविदास गायकवाड, वैशाली खरात, कल्पना शिंदे, संगिता डिखळे, ज्योती कोळी, सुनिता कुंवर, स्वाती गुरव, मनिषा हंगरगे, वैशाली घाडगे तसेच नागरिक उपस्थित होते.

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!