नवी सांगवी,दि. १४( punetoday9news):- सांगवी फाटा येथील बी.आर. घोलप बस स्थानकाजवळ रविवार (दि.१४) पहाटे १ वाजता पिकअप जीप व कारचा अपघात होवून यात वाहनांचे मोठे नुकसान झाले मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही .

औंध कडून सांगवीकडे जाणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या (एम एच १४ एच यू ८०२९) पीकअप जीप वाहनास वळणावर निळ्या रंगाची मोटर कार  (एम एच ११ सी जी ६२१५) येवून धडकली.

यावेळी वळण मार्गावर मोटर कारच्या वाहन चालकाचा ताबा सुटल्याने समोरून येणाऱ्या पीक अप जीपला धडकल्याने अपघात झाला. यावेळी मोटर कारचे मोठे नुकसान झाले.
मोटर कार मध्ये एकूण पाच प्रवासी होते.  चालक व शेजारील प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना औंध जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे . तर इतर तीन प्रवासी किरकोळ जखम झाले आहेत. त्यांना जुनी सांगवी येथील माकन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले . अशी माहिती सांगवी पोलिसांकडून मिळाली.
पीकअप जीपला उजव्या बाजूला मध्यभागी धडकल्याने थोडेसे नुकसान झाले. घटनास्थळी अपघात झाल्याने बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली होती.

यावेळी सांगवी वाहतूक वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे, वाहतूक पोलीस हवालदार जी. डी. जाधवर, सांगवी पोलीस एएसआय विजय शेलार, पोलीस हवालदार लोणकर, पोलीस शिपाई कडक उमरगे, एस. एस, लाकावडे, ए. व्ही. भोसले याप्रसंगी उपस्थित होते. सांगवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 

Comments are closed

error: Content is protected !!