नवी सांगवी, दि.१६ ( punetoday9news) :- भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण झाल्याने संपूर्ण देशभरात आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. त्यानुसार पिंपरी चिंचवड शहरातील नवी सांगवी व पिंपळे गुरव परिसरात भाजपच्या वतीने मोठ्या आनंदात अमृत महोत्सवाची पदयात्रा काढण्यात आली.
आपला भारत देश स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण करत असताना हा अमृत महोत्सवी स्वातंत्र्योत्सव ज्यांच्या बलिदानामुळे आज आपणास पाहायला मिळत आहे, अशा विविध स्वातंत्र्यवीर हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी,त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी नवी सांगवी-पिंपळे गुरव परिसरात भव्य अशी ही तिरंगा रॅली काढण्यात आली. नव्या पिढीला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या क्रांतिकारकांचा इतिहास समजावा हाच या रॅलीचा मुख्य उद्देश होता. नवी सांगवी कृष्णा चौक येथील भाजपच्या सांगवी – काळेवाडी मंडल कार्यालयासमोरून भारत माता की जय, वंदे मातरमच्या जयघोषात ध्वजारोहण करून या रॅलीस प्रारंभ करण्यात आला . भारत माता की जय च्या जयषोघाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. नवी सांगवीकर मोठ्या उत्साहाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
ही तिरंगा रॅली कृष्णा चौक – क्रांती चौक- फेमस चौक – साई चौक तसेच माहेश्वरी चौक – एम एस काटे चौकातून पुन्हा कृष्णा चौकात अली.यावेळी नागरिकांनी भारत माता की जय” च्या घोषणा देत रंगीबेरंगी फुलांची उधळण करत आनंद घेतल्याचे दिसून आले.
या तिरंगा रॅलीमध्ये माजी महापौर माई ढोरे, भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख माजी नगरसेवक शंकर जगताप, राजेंद्र राजापूरे, उद्योजक विजय जगताप अनेक मान्यवर , कार्यकर्ते , नागरिक व विद्यार्थी मोठया संख्येने सहभागी झाले होते.
Comments are closed