पुणे, दि. १६( punetoday9news):-  पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मामासाहेब मोहोळ महाविद्यालयामध्ये ७५ वा स्वातंत्र्य दिन (अमृत महोत्सव) मोठ्या उत्साहात व चैतन्यमय वातावरणात संपन्न झाला.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव ॲड. संदीप कदम (अधिसभा सदस्य, सा. फुले पुणे विद्यापीठ ) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे, संस्था अधीक्षक सीताराम अभंग, संशोधन अधिकारी देशपांडे, उपप्राचार्य डॉ. शिंदे एस.बी., कनिष़्ट विभाग प्रमुख प्रा. संजय भोईटे, व्यवसाय प्रमुख प्रा.अरूण शिंदे, शारिरीक शिक्षण संचालक डॉ. योगेश पवार, क्रीडा शिक्षक प्रा.अनिल दाहोत्रे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.नीता कांबळे, विदयार्थी विकास मंडळ प्रमुख डॉ. आदिनाथ पाठक, रा. सेवा योजना प्रमुख डॉ.भरत राठोड, सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी डॉ. बाळकृष्ण झावरे यांनी उपस्थितांना ध्वज शपथ देत अमृत महोत्सव साजरा करताना विद्यार्थ्यांनी नवीन शैक्षणिक धोरण विचारत घेतले पाहिजे. महाविद्यालयात सुरू झालेल्या नवीन व्यावसायिक शिक्षणाचा फायदा घेत स्वतःच्या पायावर उभे राहत आत्मनिर्भर झाले पाहिजे. महाविद्यालयात आयोजित विविध उपक्रमांची माहिती देवून प्रास्ताविक सादर केले. यावेळी प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे यांनी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे पुष्प गुच्छ देवून स्वागत केले व सर्व उपस्थितांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.


याप्रसंगी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सविव ॲड. संदीप कदम यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, विद्यमान विरोधी पक्षनेते व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजित पवार व सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांच्या वतीने अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत भारताने मागील ७५ वर्षांमध्ये सर्व क्षेत्रांमध्ये खूप प्रगती केली आहे ही प्रगती करताना यामध्ये खूप जणांचे योगदान आहे भारताचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या हुतात्म्यांनी आपले बलिदान केले त्या सर्वांचे स्मरण करणे व त्यांचे बलिदान लक्षात ठेवणे आपले आद्य कर्तव्य आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी व युवा पिढी हे भारताचे भविष्य आहे व त्यांनी सर्व क्षेत्रांमध्ये अजून प्रगती करावी असे आपल्या अध्यक्षीय भाषणात मनोगत व्यक्त केले.

अमृत महोत्सव स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने प्रमुख पाहुण्याच्या हस्ते शांती चे प्रतीक म्हणून हवेत तिरंगा रंगाचे फुगे सोडण्यात आले.तसेच संस्था कार्यालय व महाविद्यालय परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले होते.
भारताचा ७५वा स्वातंत्र्यदिनाचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी विदयार्थ्यांनी वेगवेगळ्या पारंपरिक वेशभूषा परिधान करून स्वातंत्र्य मिळविण्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे स्मरण, समाज एकजूटीचे, आरोग्य, पर्यावरण इ. विषयी वेगवेगळे संदेशफलक हाती घेऊन कोथरूड परिसरात प्रभात फेरी रॅलीचे अयोजन करण्यात आले. या रॅलीचे यशस्वी नियोजन करणे साठी प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.प्रिया आरडे, प्रा. संजय भोईटे, प्रा. अरूण शिंदे प्रा. अनिल दाहोत्रे, प्रा.मूल़्ल़ा व सर्व कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय विभागातील प्राध्यापक व सर्व प्रशासकिय सेवकांनी सक्रिय सहभाग घेतला. या ध्वजारोहण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. योगेश पवार यांनी केले.

याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी, समिती समन्वयक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!