पिंपरी, दि. १६( punetoday9news):- यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सच्या चिंचवड येथील प्रांगणात स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजवंदन सोहळा आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या मनुष्यबळ व्यवस्थापन व प्रशासन विभागाचे वरिष्ठ प्रमुख संदीप बिडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला.
यावेळी त्यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या शुभेच्छा देत मार्गदर्शन केले.यावेळी यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्सचे संचालक संजय छत्रे संस्थेच्या मार्केटिंग विभागाचे प्रमुख प्रशांत कुलकर्णी ग्रंथपाल पवन शर्मा व संस्थेच्या एमबीए व एमसीए अभ्यासक्रमाचे विद्यार्थी शिक्षक व अन्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयआयएमएस चे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी केले.
Comments are closed