पिंपरी, दि. १७( punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडीमधील साईनगरी हौसिंग सोसायटीत टिकाऊ पासून टिकाऊ प्रेरणा देणारा उपक्रम राबवण्यात आला.   

१५ ऑगस्ट स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने सोसायटीतील जुन्या सायकल समोर आल्या असता त्या भंगारात देण्यापेक्षा त्या दुरूस्त करून गरजू विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. आणि यातून जवळपास १३ जून्या सायकल पुनरुत्थान समरसता गुरुकुलम आश्रमशाळेस देण्यात आल्या.

संजय जोगदंड, बाळासाहेब पावडे यांनी या साठी पुढाकार घेतला.  सर्व कामासाठी सोसायटीतील सभासदांनी वर्गणी जमा केली. १३ सायकल दुरुस्त करून झाल्यावर उरलेल्या पैशातून मुलांसाठी  २०० वह्या व पेन चित्रकला पुस्तक, रंगपेटी, बसण्याचे गालीचे, किराणा सामान व खाऊ देण्यात आला.

या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष गिरिष प्रभुणे व सतिश अवचारे यांनी सभासद व सोसायटीचे कौतुक केले.

या उपक्रमासाठी गिरिष लोळगे, कुन्दन वर्मा, प्रदिप बोरसे, आनंद कदम, प्रशांत नाईक,श्रीकांत पार्सेकर, सचिन घाडगे, निलेश पाटील, अविनाश देशमुख, अमोल मते, धनंजय येडे, ब्रिजेश सिंग व इतर सभासदांनी सहकार्य केले.

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!